gauri ganpati sms in marathi image wallpaper wishes message story status गौरी गणपती greetings

whatsapp fb hike Gauri Pujan Ganesha festival rangoli

gauri ganpati sms in marathi image wallpaper wishes message story status गौरी गणपती greetings
gauri ganpati sms in marathi image wallpaper wishes message story status गौरी गणपती greetings


गणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात. दुसऱ्या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक असे मानले जाते.

पौराणिक कथा 
यामागची पौराणिक कथा अशी की फार पूर्वी दानवांचे राज्य होते.दानव देवांना फार त्रास देत असत.  सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो. आपले सौभाग्य अखंड रहावे हा त्यामागचा हेतू असतो.

गौरी गणपतीची आपण स्थापना करण्यापूर्वी 
सर्वत्र स्वच्छता करून रंगरंगोटी करतो. त्यामुळे मनाला प्रसन्नता वाटते मगच आपण पूजा करतो. पूजा म्हणजे आपल्या मनातील सद्भाव जणू त्या मूर्तीमध्ये ओततोच. मनोभावे पूजा केली म्हणजे मनाला जे समाधान मिळते ते ज्याचे त्यालाच माहित असते. ती पूजा अधिक सुंदर व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरास करतो. त्यासाठी आपल्यातील कला कौशल्याचा वापर करतो. त्याचे समाधान वेगळेच. प्रत्येक घरातील वेगवेगळी सजावट पाहून आपला जीव सुखावतो. या बरोबरच सुखाचा मार्ग नि:संशयपणे पोटातून जातो.


गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचागात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खड्याच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहीरीपाशी जाते, चार खडे ताम्हणात घेते, तेथून खडे वाजत गाजत घरी आणले जातात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्‍याने चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवले जातात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात.

गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील दारापर्यंत ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी "गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या- मोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबऱ्याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरीपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरीपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरीची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.

तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.

Popular posts from this blog

Marathi Adult Sexy Non Veg Sms Text Messages

Hot south indian tamil Aunty bra bikini show Kambi kadakal Hot Sexy tight jeans shirts

naughty marathi sms jokes