बाबांनी गोरगरीब, दलित,भिकारी,अनाथ यांची तहान भूक जाणली .सर्वात श्रेष्ठ असा मानवता धर्म जागविला. गरिबांच्या सेवा करण्यातच मानवी जीवन सार्थकी लागते असे त्यांना वाटे . ते खूप शिकलेले नसूनही त्यांनी अधश्रद्धा-अस्पृशता , जातीयता, याविरुद्ध प्रचार प्रसार करून जनजागृती केली.जगात सर्व समान आहेत उच्च-नीच गरीब- श्रीमंत हा भेद नाही. एकच धर्म आहे तो म्हणजे समता, एकच जागृत देवता आहे ती म्हणजे मानवता . मनुष्याच्या अंतरात्म्यात जो ईश्वर वसलेला आहे, त्याचा साक्षात्कार होण्यासाठीच डेबुजी यांचा मानव अवतार असावा.
भुकेल्यांना अन्न !!
तहानलेल्यांना पाणी !!
उघड्या नागड्यांना वस्र!!
बेघरांना आसरा!!
बेकारांना रोजगार !!
दुःखी व निरांश्यांना हिम्मत!!
- श्री संत गाडगे महाराज.
Give food to the hungry
Give shelter to the needy
Protect the environment
- Sant Gadge Baba
