Sairat Dubai UAE Zing Zing Zingat Dance In Theater


दुबईच्‍या थिएटरमध्‍ये नागराज, आकाश-रिंकू, अजय-अतुलचा झिंगाट डान्‍स, पाहा


'सैराट' संयुक्‍त अमीर अमिरातमध्‍ये प्रदर्शित झाला. शुक्रवारी सायंकाळी नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी दुबईच्‍या थिएटरमध्‍ये 'सैराट' पाहिला. यामध्‍ये 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्‍यावर त्‍यांनीच नव्‍हे तर सिनेमागृहातील प्रत्‍येक प्रेक्षकाने डान्‍स केला.
'झिंग झिंग झिंगाट' वाजवले दोन वेळा
- विशेष म्‍हणजे दुबईच्‍या थिएटरमध्‍ये प्रेक्षकांच्‍या खास आग्रहास्‍तव - 'झिंग झिंग झिंगाट' हे गाणे दोन वेळा वाजवले.
- या दोन्‍ही वेळा सिनेमागृहाच्‍या पडद्यासमोर उभे राहून नागराज मंजुळे, अजय-अतुल आणि रिंकू- आकाशने उर्स्‍फुत न्‍यृत्‍य केले.
- संपूर्ण सिनेमा हॉल 'सैराट'मध्‍ये झाला होता.

Labels: